सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, आम्ही राम मंदिर उभारणारच - साध्वी प्राची

Update: 2018-10-30 13:27 GMT

आज विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी राम मंदिरप्रकरणी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

त्या म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, आम्ही राम मंदिर उभारणारच, राम मंदिरप्रकरणी लवकर निकाल यावा यासाठी आम्ही या खटल्याच्या सुनावणीसाठी वेगळ्या खंडपीठाची मागणी केली होती. दीर्घकाळापासून हे प्रकरण प्रलंबित आहे, आम्हाला फक्त तारखाच मिळत आहेत. आता सर्व हिंदू निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निर्णय आला पाहिजे, त्यामुळे हिंदूच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा साध्वी प्राची यांनी दिला आहे.

 

Similar News