राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्टेशन वर एका टॅक्सी ड्रायव्हरने टॅक्सी सेवेची विचारणा केली होती. या टॅक्सी ड्रायव्हरचे नाव कुलजीत सिंघ मलहोत्रा असं आहे. त्याला नकार देऊनही तो सुप्रिया सुळे यांचा रस्ता आडवत होता. या प्रकरणाची त्यांनी रेल्वे पोलीसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी त्याला अटक करून दंड देखील ठोठावला. त्यानंतर आज मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी या रिक्षा चालकाला पकडले. आणि आज त्यांची माफी मागितली.
कायद्यानुसार विमानस्थानक तसेच रेल्वेस्थानकावर कोणत्याही टॅक्सी चालकाला येण्यास परवानगी नाही. त्यांनी केवळ नेमून दिलेल्या टॅक्सी स्टॅंडवरच राहून, टॅक्सी सेवेची विचारणा करावी. असा नियम आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी या बाबींवर विशेष लक्ष देऊन यावर कारवाई करण्याचं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं होते. जेणेकरून इतर प्रवाशांना खास करून महीलांना याचा त्रास होऊ नये. त्यानंतर आज मनसेने या टॅक्सी ड्रायव्हरला पकडून त्याला माफी मागयाला लावली.