सध्या #MeeToo च्या वादळाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींना नव्या वादात अडकवले आहे. आता आणखी एका अभिनेत्रीने याबाबतचा खुलासा केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिने कास्टिंग डायरेक्टर राजा बजाज यांच्यावर त्यांनी आपल्याला कपडे काढण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप केला आहे. तिने याबाबत माहिती देताना ती म्हणाली, एका ऑनलाइन पोर्टलवरून ऑडिशनबाबत समजले. कास्टिंग डायरेक्टर राजा बजाज यांनी ही ऑडिशन घेतली होती. ऑडिशन खूपच वाईट झाल्याने मला भूमिकेसाठी नकार मिळाला, पण सहाय्यक म्हणून काम करशील का असे त्यांनी विचारले. त्यानंतर एका चित्रीकरणासाठी त्यांच्यासोबत लोणावळय़ाला गेले असता त्यांनी मला कपडे काढण्यासाठी बळजबरी केली.