भारताची सर्वोत्कृष्ट टेनिसपटू सानिया मिर्झाला आज पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तिचा पती पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरुन ट्विट करुन हि गोड बातमी शेअर केली आहे.
२०१० मध्ये सानिया आणि शोएब यांचे लग्न झाले. त्यांनी हि बातमी शेअर करताना असे म्हटले आहे की, तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मुलगा झाला आहे. सानियाची प्रकृती उत्तम आहे. आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.
https://twitter.com/realshoaibmalik/status/1057090038993870849