सुषमा अंधारे धावल्या मदत कार्याला

Update: 2019-08-04 16:48 GMT

पुणे जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग सुरू असून पानशेत वरसगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. खडकवासला धरणातून विसर्ग चालू असल्याने खाली नदीपात्रात पाणी तुडूंब भरून होळकर ब्रीज पुर्णतः पाण्याखाली गेलाय.

[gallery td_select_gallery_slide="slide" ids="47884,47885,47886,47887,47888"]

त्यामुळे पुण्याच्या विश्रांतवाडीतील शांतीनगर भागात पाणी शिरलंय. शांतीनगर भागातील गरीब कष्टकरी लोकांच्या झोपड्या काही पक्की घरं पाण्याखाली गेलीयत. अशा वेळी लोकांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे पाण्यात उतरल्या असून स्वत: भर पावसात पाणी भरलेल्या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत करत आहेत. लहान मुलांना स्वत: खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षित स्थळी पोहोचवत आहे. सध्या सुषमा अंधारे यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. सुषमा अंधारे आणि गणराज्य संघाची टीम सकाळपासून लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवत आहे

Similar News