राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रेल्वेबाबतच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. अत्यंत अनोखे असे आंदोलन पुकारुन त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. त्यांनी सकाळी साडेसहा वाजता धरणं आंदोलन केले.
या आंदोलनातून त्यांनी दौंड ते पुणे विद्युत लोकल तातडीने सुरू करणे, दौंडला पुणे रेल्वे विभागाचे सबअर्बन म्हणून मान्यता देणे, दौंड पुणे रेल्वे मार्गावरील मांजरी व कडेठाण येथे बंद पडलेली कामे सुरू करणे या मागण्या केल्या.
त्यांनी आंदोलनात सांगितले की, " सर्व मागण्या वेळोवेळी रेल्वे प्रशासन व केंद्राकडे सातत्याने केल्या आहेत. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनियमित लोकलमुळे त्रास सहन करावा लागतो, दरम्यान, वारंवार बैठक, विनंती करूनही यावर अद्याप तोडगा निघत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे."