सिंटाने दाखवलेला पाठिंबा केवळ मीडियाला दाखवण्यासाठी - तनुश्री दत्ता

Update: 2018-10-20 12:57 GMT

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपानंतर आता सिने अॅन्ड टीव्ही असोसिएशन म्हणजेत सिंटाने या प्रकरणाबाबत निर्णय घेतला आहे. ज्यामुळे तनुश्री दत्ताने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सिंटाने तनुश्रीच्या आरोपाबाबत १० वर्षांपूर्वी दखल न घेतल्याने तिची माफी मागितली. व याबाबत नाना व इतर चौघांवर कारवाई करु असे देखील म्हटले आहे.

परंतू तनुश्रीने सिंटाला प्रश्न केला की, "तुम्ही या प्रकरणात मला कायदेशीर कारवाईत मदत करणार का?" त्यावर सिंटाने 'कायदेशीर प्रकरणात मदत करण्याचे आमचे धोरण नाही' असे म्हणून नकार दर्शवला. त्यामुळे तनुश्रीने नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, “सिंटाने मागितलेली माफी आणि 'मी टू'ला दिलेला पाठिंबा केवळ मीडियाला दाखवण्यासाठी आहे का? 'मी टू' मोहिमेअंतर्गत आरोप झालेल्यांना मोठ मोठे प्रोडक्शन हाऊस बाहेर काढत असताना हास्यास्पद अशी सिंटाची कारवाई आहे. तसेच या प्रकरणानंतर जर नाना पाटेकरांना 'हाऊसफुल ४'मधून काढण्यात आले होते तर मग आता त्यांनी ६ दिवस केलेले चित्रपटातील शूट दाखवण्यात येणार असल्याचे समजत आहे तर हा कसला सपोर्ट?” असे अनेक प्रश्न तिने उपस्थित केले.

Similar News