पार्श्वगायिका सोना मोहपात्रानंतर आता आणखी एका गायिकेने संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. गायिका श्वेता पंडित हिने हा आरोप केला आहे. तिने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करुन याचा खुलासा केला आङे.
तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, '२००० साली मोहब्बते या चित्रपटात मला गाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी माझं खूप कौतुक झालं होतं. मला गाण्यातच पुढे करिअर करायचं होतं. २००१ मध्ये अनू मलिक यांचे व्यवस्थापक मुस्तफा यांचा मला फोन आला आणि त्यांनी एम्पायर स्टुडिओत बोलावलं. मी खूपच उत्सुक होते. अनू मलिक यांनी मला गाण्यास सांगितलं आणि माझ्या गायनावर ते खूप खूश झाले. ते म्हणाले मी तुला शान आणि सुनिधीसोबत गाण्याची संधी देईन, पण मला आधी एक किस दे. मी खूप घाबरले. तेव्हा मी जेमतेम १५ वर्षांची होती. ते माझ्या कुटुंबीयांना ओळखायचे. मी त्यांना अनू अंकल म्हणायची. त्यांना दोन मुली असताना एका अल्पवयीन मुलीशी ते असं कसं वागू शकतात हा प्रश्न मला भेडसावत होता. त्या घटनेचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की मी इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते,ज्या तरुणी अनू मलिक यांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी समोर येऊन आवाज उठवा.' असे आवाहन तिने केले आहे.
https://twitter.com/ShwetaPandit7/status/1052490035407204353