पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात मदत पोहचवली जात आहे. या मदतीने सांगली-कोल्हापूर मधील गावकऱ्यांना मोठा आधार मिळतोय. पण आता पूर ओसरल्यानंतर जगण्याच्या धडपडीत पुरग्रस्तांमध्ये मदत मिळवण्यासाठी चढाओढ सुरु झाल्याचे चित्र अनेक भागांमध्ये दिसून येत आहे.
प्रत्येक जण आपला मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी झटतोय. पुरेसे अन्न, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, अंगावर कपडे, अशा दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या कुंटुंबाला मिळाव्यात म्हणून मदतीसाठी येणाऱ्या वाहनांसमोरच स्पर्धा सुरु होतेय. सांगलीच्या गावातील एका आजीनी लोकांच्या अशा वागण्यावर दुःख व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहुयात व्हिडीओ...