उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबाला न कळवताच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर सदर मुलीवर अत्याचार झाला नसल्याचं बोललं जात आहे. अशा वेळी सदर मुलीवर अत्याचार झाला होता. हे कसं सिद्ध करणार? एखादा मुलीवर अत्याचार झाल्यास पुरावे नष्ठ होऊ नये म्हणून नक्की काय करायला हवे? या संदर्भात आम्ही कायदेतज्ञ रमा सरोदे यांच्याशी बातचित केली. त्या म्हणतात...
बलात्काराबाबत कोणी कुठं बोलत नाही... घरातील व्यक्तीची इज्जत जाईल. खूप दिवसांनी पीडित महिला घरातील एखाद्या व्यक्तिला सांगते. मात्र, तो पर्यंत सगळे पुरावे नष्ठ झालेले असतात. त्यामुळं समाजात अनेक महिला भितीपोटी बलात्कार झालेला असताना देखील समोर येऊन बोलत नाही. या सर्वांमध्ये जेव्हा तिच्यामध्ये हिम्मत येते तेव्हा ती बोलते. मात्र, तो पर्यंत सर्व पुरावे नष्ठ झालेले असतात.
एखाद्य़ा स्त्रीवर अत्याचार झाला असल्यास पुरावे नष्ठ होऊ नये म्हणून काय करावे?
एखाद्या महिलेवर जर अत्याचार झाल्याचं समोर आलं तर सदर महिलेला तुझ्यावर बलात्कार का झाला? असे प्रश्न विचारु नये. तिला मानसिक आधार द्यावा.
आपण या कठीण समयी तिच्या सोबत उभे आहोत. याची जाणीव तिला करुन द्यावी. जेनेकरुन ती या विषयी मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलेल. अत्याचार झालेल्या महिलेने अंघोळ करु नये.
अत्याचाराच्या वेळी अंगावर जे कपडे होते. ते फेकून देऊ नये. ते एका प्लास्टिकच्या पिशवीत सोबत घ्यावेत. आणि तात्काळ नजिकच्या पोलिस स्टेशनला तक्रार द्यावी.
तक्रार देताना अत्याचाराच्या वेळी अंगावर जे कपडे होते. ते कपडे पोलिसांना प्लास्टिकच्या पिशवीत भरुन द्यावे. त्याचा उपयोग फॉरन्सिक लॅबसाठी होतो. त्यातून मोठ्या प्रमाणात पुरावे मिळतात.
अत्याचार झालेल्या महिलेने अंघोळ केल्यास तिच्या अंगोवर ज्या जखमा असतात, जे मार्क असतात. ते पुसण्याची भीती असते.
गुन्हा घडण्यापुर्वी जर आरोपीने तरुणीचा पाठलाग केला असेल, गुन्हा घडण्यापुर्वी नक्की काय काय घडलं होतं. याची पार्श्वभूमी पोलिसांना देणं गरजेचं आहे.
पीडितेला अशावेळी आधाराची गरज असते. त्यामुळे अशावेळी समुपदेशकाची भेट घ्यावी.
पीडितेवर मानसिक आघात झालेला असताना तिचं रडणं साहजिक असतं. तिचं म्हणनं ऐकून घेतलं पाहिजे. तिच्यावर जो आघात झालेला असतो. त्यासाठी तिच्या बाजूनं उभं राहणं गरजेचं असतं. तिला समजून घेणं गरजेचं असतं.
असं मत रमा सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.