आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंन्द्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. यावेळी मोदींनी गांधी घराण्यावर टीका देखील केली.
त्यानंतर लेखिका शोभा डे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आझाद हिंद सेनेची टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही, त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करुन त्यांना ट्रोल केले आहे. युजर्सनी गांधीजींची टोपी परिधान करुन गांधी होता येते का? नेहरुंचं जॅकेट परिधान करुन नेहरु होता येते का? शोभा डे या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, अशा टीका केल्या आहेत.