सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित ब्रह्मोद्योग-२०१८ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात महिला मेळावा आयोजीत केला होता. त्यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
त्यांनी या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, समाजात असमानता निर्माण करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र ही असमानता निर्माण करणा-या ‘बारामतीकरांच्या’ लक्षात येत नाही की, यापुवीर्ही देशाचे नेतृत्व ब्राम्हण समाजाने केले आहे. आणि यापुढेही करेल. त्यांच्या या वक्तव्याने त्या आता वादात येण्याची शक्यता आहे.