संपूर्ण देश लॉक डाऊन असताना काल वांद्रे मध्ये एक अनाकलनिय घटना घडली. ही घटना अजाणते पणा ने घडली की सत्ते शिवाय वेड्यापिशा झालेल्या जमातीं नी ही हेतूपरस्पर घडवून आणली. या बाबत वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत.
या घटने नंतरचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकंदर वर्तण हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. खरंतर मी जेवढे त्यांना ओळखते ते एक अत्यंत अभ्यासू, उत्तम वकृत्व शैली असणारे आणि शक्यतो कोणाचाही द्वेष न करणारे असे ते नेते होते. त्यामुळे त्या वेळी एकनाथ खडसेंना डावलून त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्या नंतर जसे सर्वांसोबत होते. तेच झाले. आणि मग खुशमस्कर्यांच्या गर्दीत जुने देवेंद्र कुठे तरी हरवून गेले.
मुख्यमंत्र्यांची गादी हा माझा तहयात हक्क आहे. ही त्यांची वृत्ती उफाळून आली. इतकी की आता पूला खालून बरंच पाणी गेले. तरी देवेंद्र जी हे मानायलाच तयार नाहीत. हे त्रांगड सरकार आज ना उद्या पडणार आणि परत मीच मुख्यमंत्री होणार. हा भ्रम त्यांना शांतच बसू देत नाही. मग त्यासाठी या सरकार ला कोंडीत पकडण्याची एक ही संधी ते सोडायला तयार नाहीत.
विरोधी पक्ष म्हणून आक्रमक पणे काम करणे हे लोकशाही संकेताना धरूनच आहे. पण अटीतटीच्या प्रसंगात सरकार ला पुढे होऊन शक्य ती मदत करणे. हे सामर्थ्यवान विरोधी पक्ष नेत्याचे लक्षण आहे. ते न करता लॉकडाऊन च्या काळात सतत सरकारला आरोपी च्या पिंजऱ्यात उभे करून राज्यपालांची भेट घेऊन काड्या करण्याचे काम ते करत आहेत. सत्तेच्या हव्यासापायी एक अत्यंत ताकतीचा नेता हे सगळे उपद्व्याप करतोय. याच दुःख माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे. मग मी कोणत्या पक्षा ची हा विषय इथे गौण आहे. कारण आम्हा कार्यकर्त्यां ची ही एक जमात असते. आणि तिथे हाडाच्या कार्यकर्त्या चे खचितच कौतूक असते. त्यामुळे फडणविसांना लवकर सद्बुद्धी यावी हीच प्रभू रामचंद्रा कडे प्रार्थना.
आता या घटनेचा दूसरा भाग म्हणजे न्यूज चॅनेल्स. मी कॉंग्रेस पक्षा ची प्रवक्ता आहे. आणि त्या माध्यमातून मी गेल्या पाच/सात वर्षात सर्वच चॅनेल्स चे काम अत्यंत जवळून पाहीलेले आहे. स्डूडिओ मधली ती लगबग, थडाथड देश भरातून येऊन आदळणाऱ्या त्या बातम्या त्या मध्ये चॅनल चा मालक कोण? त्या प्रमाणे अक्षरशः मिनीटा मिनीटां ला बातम्यां चे बदलणारे क्रम. कोणत्या बातमी ला महत्व द्यायचं आणि कोणती बासणात गुंडाळायची? याचे फटाफट घेण्यात येणारे निर्णय हे सगळं तीथं अक्षरशः विचारांच्या वेगाने धावत असतं. आणि बाकीची पात्रे आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करीत असतात. त्या मध्ये त्यांची स्वतःची मते असतात, विचारधारा असते. पण ती सगळी गुंडाळून ठेऊन आर्थिक गणित कटाक्षाने संभाळीत मागणी तसा पुरवठा किंवा जे विकले जाईल ते च पिकवायचे. या न्यायाने इथली यंत्रणा रात्रंदिवस काम करीत राहाते.
मुळात म्हणजे चॅनेल चालविणे हे अत्यंत खर्चिक काम आहे. आणि त्यांची उपयुक्तता हेरून काही पक्षांनी बराच मोठ्या प्रमाणात पैसा तिथे अडकवला आणि मोठ मोठ्या जहिरातींच्या माध्यमा मधून त्यांना अक्षरशः विकत घेतले.
काही मोठ्या उद्योगपतींना सरकारला दूखवून चालत नाही. त्यामुळे निष्पक्ष पत्रकारीता करायची म्हटली तर चॅनेलच बंद करावे लागेल, त्यातून ही ज्यांनी हा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याची परिणीती म्हणजे त्यांना घरी बसावे लागले. पूर्वी आज सकाळी बातमी वाचली की, उद्या सकाळ पर्यंत लोकांच्या डोक्याला खूराक नसायचा. पण आता मिनीटा मिनीटांचा अपडेट आणि ‘सबसे आगे सबसे तेज’ च्या जमान्यात बातम्या दाखविणे, कधी कधी त्या जनरेट करणे हे भयंकर चॅलेंजिग झालेले आहे. इथे प्रत्येका ची व्यथा आहे. फिल्डवर काम करणाऱ्यांचे हाल तर शब्दात सांगू शकत नाही, अपूरा पगार आणि गुरा सारखे काम असंच त्यांच वर्णन करावे लागेल.