#Mee too मी लहानपणीचं लैंगिक गैरवर्तनाचा किळसवाणा अनुभव घेतला - सई परांजपे
आज प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनीही 'मीटू' मोहिमेद्वारे आपल्यावरील लैगिंक अत्याचाराचा अनुभव शेअर केला आहे.
त्यांनी 'मुंबई मिरर' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ मी लहानपणीचं लैंगिक गैरवर्तनाचा किळसवाणा अनुभव घेतला. पुण्यात सायकलवरून जात असताना एका रोडरोमिओने भररस्त्यात माझी छेड काढली होती. पोलिस ठाण्यापर्यंत त्याने माझा पिच्छा पुरवला होता. मला याविरोधात पोलिसात जायचे होते. पण दुसºया सकाळी पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा सल्ला मला देण्यात आला होता. सिनेसृष्टीतील अनेक पुरूषांची बळजबरीने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते. कार्यक्रमातून निघाताना या केंद्रीय मंत्र्याने मला घरी सोडून देण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्याच्यासोबत निघाले. पण यादरम्यान माझ्यासोबत एक रात्र घालवशील का, अशी विचारणा करणारी चिठ्ठी त्यांनी मला दिली. मी त्यांना यासाठी स्पष्ट नकार दिला,”
पुढे त्यांनी या मोहिमेला पाठींबा देत त्या म्हणाल्या की, 'मीटू' मोहिमेअंतर्गत अनेक महिला आवाज उठवताना दिसत आहेत. पण ही मोहिम केवळ तात्पुरती नसावी. यातून काहीतरी ठोस निष्पण्ण व्हावे.