आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी काँग्रेस तर्फे राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र या काँग्रेसच्या निर्णयाला बसपाने विरोध दर्शवला आहे.
बसपाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांचा या निर्णयाला विरोध दर्शवला. ते म्हणाले की, "पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्यापेक्षा विरोधी पक्षाकडून मायावतींना योग्य समजतात. तसेच, मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा राहिल्या आहेत. राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे मायावतींना सर्वजण प्रधानमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पाठिंबा देणार आहेत."