भारत हा विकासशील देश आहे. भारतात चंद्रयान 2 ची तयारी सुरु आहे. त्याच देशातल्या भौतिक सुविधांचे धिंडवडे जगात निघत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील मिरगुळवंचा येथील
बाली आकाश लेकामी हिला(22) हिला प्रसुती कळा येऊ लागल्या. घरच्यांनी बाळंतपणासाठी वैदुला बोलावलं. तिची प्रसुती घरीच करण्याची तयारी सुरु झाली. गावातील आशा कार्यकर्ती प्रज्ञा दुर्वा यांना हे समजताच त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद मेश्राम यांना सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार आशा कार्यकर्तीने रुग्नालयात नेण्यासाठी विनंती केली. मात्र या दरम्यान रस्त्यात असणाऱ्या नाल्यात पाणी असल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहचू शकत नव्हती. त्यामुळे घरच्यांनी सदर रुग्नाला खाटेवर टाकून पाण्यातून जंगल रस्त्याने रुग्नवाहिकेपर्यंत पोहचवले. आशा कार्यकर्ती प्रज्ञा दुर्वा तसेच रुग्नवाहिका चालक पिंटुराज मंडलवार यांनी राखलेल्या प्रसंगावधानाने रुग्नास हेमलकसा येथील रुग्नालयात दाखल केले. तिची सुखरुप प्रसुती झाली असून बाळ आणि माता हे दोघेही चांगले आहेत.
गडचिरोलीतील दुर्गम भागात अनेक आरोग्याच्या सुविधा आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य अधिकारी डॉक्टर चांगली सेवा देत असतात. पण घरी प्रसुती होण्याचे प्रमाण या भागात जास्त आहे. गावातील आशा कार्यकर्तीच्या प्रसंगावधानाने अनेक ठिकाणी सुखरुप प्रसुती झाल्या आहेत. प्रसुतीसाठी अनेकदा नातेवाईक दवाखान्यात नेण्यास तयार नसतात. अशा वेळी गावातील आशा कार्यकर्ती त्यांना समजावत असते. अनेकदा तिच्यात आणि नातेवाईकांच्यात वादाचे प्रसंगदेखील ओढावतात.
कारवाफा आरोग्य केंद्रातील येडमपायली गावात स्त्रीला प्रसंवेदना सुरु झाल्या वैदुला बोलावले परंतु बाळ पोटातच मरण पावले होते. तेथील आशा कार्यकर्तीने समजावले.पण नातेवाईक दवाखान्यात नेण्यास तयारच होत नव्हते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुंगाटी यांनी पुढाकार घेउन रुग्नवाहिका आणली. डॉक्टरांनी त्या स्त्रीला दवाखान्यात नेले. तेथून चंद्रपुरला रेफर केले. त्यानंतर त्या रुग्नाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. तेथील आशा कार्यकर्तीने त्यावेळी प्रसंगावधान राखले नसते तर बाळाच्या मातेला जीव गमवावा लागला असता.
गडचिरोलीत ऐका बाजुला आरोग्याच्या समस्या आहेत तर दुसऱ्या बाजूला रुग्नाला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ते पुल यांच्या सुविधा नाहीत. अनेक डॉक्टर मनापासून रुग्नसेवा करतात पण अनेक रुग्नालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच गावकऱ्यांचे आरोग्य शिक्षण होणे आवश्यक आहे. जगात चंद्राकडे दोनदा जाण्यासाठी तयारी करणाऱ्या देशात पुल नसल्याने रुग्नाला खाटेवरुन न्हावं लागणं हि शरमेची बाब आहे.