सध्या #Metoo मोहिमेतून अनेकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होत आहे. सध्या याच मोहिमेतून आलोकनाथ हे देखील वादात आले आहेत. त्यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी आरोप केले असून अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी त्यांच्याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “आलोकनाथ हे सूर्यास्तानंतर दारू पिण्यास सुरुवात करतात आणि एकदा मद्यधुंद अवस्थेत ते माझ्या खोलीत घुसले होते. दारूच्या नशेत ते काहीही बरळत होते आणि माझ्या खोलीतून बाहेर जाण्यास त्यांनी नकार दिला. मी ओरड घातल्यावर इतर लोक आले आणि त्यांना बाहेर घेऊन गेले, असा हिमानीचा आरोप आहे. एकदा ते उघड्यावर लघुशंका करताना पकडले गेले होते तर उद्धटपणा केल्याने त्यांना विमानातून खालीही उतरवण्यात आले होते”