अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांबाबत केलेल्या वादग्रस्त आरोपामुळे सध्या हे प्रकरण फारच चर्चेत आले आहेत. दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने नानांबाबत केला होता.
नानांनी याविषयी आरोप खोटे असल्याचा दावा केला. तनुश्री बऱ्याच दिवसांनंतर परतली पण ती येताच तिने खूप मोठा गौप्यस्फोट केला. तिच्या या आरोपानंतर #MeToo नावाची मोहिम सुरु होऊन अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारासंबंधी आवाज उठवला.
तनुश्री एका वृत्तपत्राच्या मुलाखती दरम्यान म्हणाली, “ मला हे पाऊल उचलण्यासाठी देवाने माझी निवड केली. जी गोष्ट घडायची होती त्याची सुरुवात करण्यासाठी देवानेच माझी निव़ड केली होती. ख्रिस्तधर्म, बौद्धधर्म, योगविद्या आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या #MeToo चळवळीमुळे मला झाल्या प्रकरणाविषयी खुलेपणाने बोलण्याची प्रेरणा मिळाली, मी या गोष्टीविषयी फार काही बोललोच नसतो तर अशी कोणतीच चळवळ इथे सुरु झाली नसती,” असे वक्तव्य तनुश्रीने यावेळी केले.
“महिलांनी अशा प्रकरणांवर खुलेपणाने भाष्य करावं” अशी मागणी देखील तनुश्रीने यावेळी केली.