भाजप महिला पदाधिकारीच्या हत्येचं कोड उलगडले!

Update: 2018-10-14 10:53 GMT

नालासोपाऱ्यातील भाजपच्या महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण यांच्या हत्येचं मुळ पोलिसांनी शोधून काढले आहे. त्यांची हत्या हि त्यांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या नितीन चाफे यानेच केल्याचे समोर आले आहे.

नितीनला रुपाली चव्हाण नेहमी काम नीट करण्यावरुन ओरडत असतं, त्याच रागात नितीनने त्यांची हत्या केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. हत्या केल्यावर त्याने चोरलेल्या रुपाली यांच्या एटीएमवरुन तो पोलीसांच्या जाळ्यात अडकला. त्याने ज्या एटीएममधून पैसे काढले त्याबाबतची माहिती पोलीसांना मिळाली व त्याला पोलीसांनी अटक केली. त्याला सध्या १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Similar News