पगारवाढीसाठी दूरदर्शनचे कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
गेली १० ते २५ वर्षे हे संपकरी कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर दूरदर्शनसाठी काम करतात. या कर्मचाऱ्यांना दरमहा १५ हजार ८४० रूपये वेतन मिळतंय. इतके वर्ष काम केल्यानंतरही या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली नाही. त्यामुळं यासंदर्भात अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय.
एका संपकरी कर्मचाऱ्याने या संदर्भात ट्विट केलंय. या ट्विटमध्ये २ हजार ८०० रुपये फक्त ऑफिसला येण्यासाठी लागतात. असं म्हटलं आहे. तुमची मुलं चांगल्या शाळेत शिकतात. आमच्या मुलांना चांगलं शिक्षण कधी मिळणार, असा थेट प्रश्नच दूरदर्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर (Shashi Shekhar) यांना या संपकरी कर्मचाऱ्याने विचारलाय. या संपकरी कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर #DoordarshanKiDurdasha या# हॅशटॅगचा वापर करून दूरदर्शनच्या प्रशासनालाच प्रश्न विचारायला सुरूवात केलीय.
Bure Din for Doordarshan
First strike of mine & a very reluctant strike for the Casual employees of Doordarshan. They have been working for the organization for the 10 to 25 yrs drawing only ₹15840 per month. To support please tweet #DoordarshanKiDurdasha to CEO @shashidigital pic.twitter.com/2JIJguJAPI
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 2, 2019