'ए ट्रिब्युट टू रितुपर्णो घोष- सीजन्स ग्रीटिंग्स' या चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात एलजीबीटी कार्यकर्ती आणि अभिनेत्री सेलिना जेटली पुनरागमन करणार आहे. ती गेल्या ७ वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होती. तोच आता सेलिना परत बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.
ती पुनरागमन करीत असलेल्या 'ए ट्रिब्युट टू रितुपर्णो घोष- सीजन्स ग्रीटिंग्स' या चित्रपटात सेलिना मुलीच्या भूमिकेत असणार आहे. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असा हा चित्रपट असणार आहे. इतक्या वर्षांनंतर सेलिनाच्या कमबॅकमुळे तिला पुन्हा चित्रपटात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.