केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांना सध्या शबरीमाला मंदिराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर टीकाकरांना उत्तर देण्यासाठी स्मृती इराणींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अगदी वेगळ्याच प्रकारे या टीकाकरांना उत्तर दिले आहे.
त्यांनी आज आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्यांनाच तोंडाला फडक्याने व शरीरसुद्धा दोरीने बांधले आहे. त्यांनी या फोटोखाली आम्ही बोललो की बोलता की बोलतात असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. स्मृती इराणींनी टीकाकरांना दिलेले हे त्यांचे मजेशीर उत्तर चर्चेत आले आहे. त्यांच्या या फोटोवर काहींनी प्रशंसा तर काहींनी टीका केली आहे.