#loksahir आण्णाभाऊंचा आदर्श तरुणांनी घ्यावा
आणाभाऊ साठेंच्या साहित्यातून परस्थितीशी लढण्याची प्रेरणा मिळते. आताच्या काळातील तरुणांनी आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या प्रश्नावर लढाई उभी करावी, अशी भावना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनी सामाजिक कार्यकर्ते युवक प्रदेश अध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टि ॲाफ इंडिया DPI सोहम लोंढे यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर : आणाभाऊ साठेंचे जीवन एक संघर्ष आहे. लोकांना त्यातून भरपूर काही घेण्यासारखे आहे. आण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळा शिकलेली व्यक्ती होती. त्यांनी दर्जेदार साहित्य निर्माण करून ठेवले आहे.त्यांच्या काळात जातीय विषमता मोठ्या प्रमाणावर होती. या विषमतेने आण्णाभाऊ साठेना शिक्षणापासून दूर ठेवले. परंतु ते खचले नाहीत.ते ज्या ठिकाणी काम करत होते,त्याठिकाणी त्यांनी पोस्टर लावण्याचे काम केले. त्यांनी समाजातील वास्तव आपल्या लिखाणातून मांडले. त्यांच्या साहित्यात बहुजन नायक दिसून येतात. आण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून परस्थितीशी लढण्याची प्रेरणा मिळते. आताच्या काळातील तरुणांनी आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या प्रश्नावर लढाई उभी करावी. त्यांच्या या साहित्यातून तरुणांना आखंड प्रेरणा मिळत राहील. असे मत सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवक प्रदेश अध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टि ॲाफ इंडिया DPI सोहम लोंढे यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलताना मांडले.
आण्णाभाऊ काल्पनिक साहित्यात रमले नाहीत
आण्णाभाऊ साठे यांनी आपले शिक्षण भौतालिक शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केले. त्यामुळेच आण्णाभाऊ साठे यांनी दर्जेदार साहित्य निर्माण केले. आण्णाभाऊ साठे च्या काळातील साहित्यिक फुलात,गवतात,आभाळात,निसर्गात रमणारे साहित्यिक होते. ते काल्पनिक जगतात रमणारे होते. पण माणसांचे जगणे मांडत नव्हते. या काल्पनिक साहित्याला फाटा देत आण्णाभाऊ साठे यांनी लोकांच्या जगण्याच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या. जी लोकं जगण्या मरण्यासाठी संघर्ष करत होती,त्यांचे जगणे आण्णाभाऊ साठे च्या साहित्यातून दिसून येते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून बहुजन समाजातील नायक,नायिकाची मांडणी केली.
जे भोगलं जे सोसल ते लिहल
सोहम लोंढे यांनी बोलताना सांगितले,की आण्णाभाऊ साठे ज्यावेळेस फकिरा कादंबरी लिहत होते,त्यामध्ये माझी कैफियत म्हणून एक मुखपुष्ट आहे. त्याच्या आतल्या भागात आण्णाभाऊ साठे म्हणतात,मी जे सोसल,भोगलं,अनुभवल तेच मी लिहल. मी काही काल्पनिक लिहल नाही. म्हणजे आण्णा भाऊनी जीवन जगत असताना ज्या गोष्टी सहन केल्या,त्याच गोष्टी साहित्यातून मांडल्या. आजच्या युवा पिढीला आण्णा भाऊचा संघर्ष प्रेरणा देणारा आहे. आपल्या बापाने आपल्यासाठी इतकं लिहून ठेवले आहे,की एकदा तरी ते वाचावे,त्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल.लढण्याची ताकत मिळेल. त्यांनी व्यवस्थेबरोबर दिलेला लढा समजून घेता येईल. आज इतक्या सोयी सुविधा आहेत,की आपल्याला प्रत्येक गोष्टीत लढायला,उभे रहायला येते.
आण्णाभाऊ च्या साहित्यात महिलांना स्थान
आण्णाभाऊ साठे च्या काळात विषमतावादी परस्थिती होती. पण आता ती परस्थिती राहिलेली नाही. आपल्याला व्यवस्थेला प्रश्न विचारता येतात. आण्णाभाऊ नी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगाला प्रश्न विचारले. आमचं जगणं मान्य करा,असे ठणकावून सांगितले. फकिरा,वैजयंती,माकडीचा माळ यात आण्णाभाऊनी नायक व नायिका उभी केली आहे. आता अलीकडच्या काळात बेटी बचाव ,बेटी पढाव अभियान जगभरात राबवण्यात आले होते. पण आण्णा भाऊ साठे नी त्याकाळी आपल्या साहित्यात महिलांना स्थान दिले होते. जी महिला चार भिंतीच्या आत असायची त्या महिलेला आण्णा भाऊ नी आपल्या साहित्याची नायिका केली. महिला सबलीकरणाचे सर्वात पहिले काम आण्णा भाऊ साठे नी केले.
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी राबवले अनेक सामाजिक उपक्रम
सोलापूर शहर चळवळींचा बाल्लेकिला समजला जातो. या शहरात चळवळींचे अनेक कार्यक्रम होत असतात. चळवळीत सक्रिय असणारे सोहम लोंढे मातंग समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. ते उच्चशिक्षित आहे. त्यामुळेच मातंग समाजातील आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून ते करत आहेत. विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. मातंग समाजाची आर्थिक चणचण ओळखून ते सोलापूर शहरात फक्त मातंग समाजासाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहेत. यामध्ये ते वधू आणि वरा कडून कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत. सोलापूरच्या नावाजलेल्या मंगल कार्यालयात ते सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. या सामुदायिक विविह सोहळ्यात ते वधू आणि वराला मोफत संसार उपयोगी साहित्याचे वाटप करतात.
पंतप्रधान,राज्यपाल,मुख्यमंत्री यांच्या अडविल्या गाड्या
रोहित वेमुला प्रकरणात सोहम लोंढे यांनी पंतप्रधानाच्या गाड्यांचा ताफा अडवून सरकारचा निषेध केला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातंग समाजावर नागपूर येथे झालेल्या लाठी हल्या प्रकरणी सोलापुरात त्याकाळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवून लाठी हल्याचा निषेध व्यक्त केला होता. त्याप्रकरणी ही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महात्मा फुले यांच्या बद्दल अनूउदगार काढल्या प्रकरणी त्यांची गाडी सोलापुरात अडवून त्यांचा निषेध करण्यात आला होता. त्याप्रकरणी हि त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सोहम लोंढे चळवळीत सातत्याने सक्रिय आहेत. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आण्णा भाऊ साठे यांची विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहेत.