सोमवारी पुण्यात लडकी हूँ लड सकती हूँ चा नारा देत महिला काँग्रेसची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. या दरम्यान उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्र कॉंग्रेसने देखील महिलांना ४० टक्के उमेद्वारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय अनेक प्रश्नांवर त्यांनी त्यांची मतं मांडली.