राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर या घडामोडींचा नेमका अर्थ काय? मनसे भाजपसोबत गेली तर उद्धव ठाकरे यांना याचा कितपत धोका असू शकतो, याबाबत चर्चा कऱणारा कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा विशेष कार्यक्रम. या चर्चेत शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी, मनसे प्रवक्ते योगेश खैरे आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला.