कोरोना काळात कर्ज न फेडणाऱ्या लोकांच्या घरांचा लिलाव करण्यात येणार असल्याची जाहिरात एका कंपनीने दिली आहे. या मुद्द्यावरुनच राजन क्षीरसागर यांनी काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशाप्रकारे बँका किंवा कंपन्या जर लोकांना लुटत असतील तेव्हा लोकांनी दाद कुठे मागायची हे कॉमर्समध्ये का शिकवले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुळात बेरोजगारी, शेतकऱ्यांची लुट, कर्जदारांची पिळवणूक यावर आताच्या अर्थशास्त्रात काहीच का शिकववले जात नाही असा सवाल कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे.