महाराष्ट्रात सहकार खात्यांची दादागीरी वाढत आहे. तमाम हाऊसिंग सोसायट्या मुंबई जिल्हा बँकेत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजप सरकार हे सहकार खात्याच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायट्यावर दबाव आणत आहे. सरकारच्या फतव्याने मुंबई बँकेत फंड आणण्याचा डाव असून सरकार मुंबई बँकेवर मेहरबान का ? असा सवाल बँकींग अभ्यासक आणि अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी उपस्थित केला आहे.