भीमा शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी दर वर्षी न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते
दरवर्षी 1 जानेवारी रोजी तमाम शाहू फुले आंबेडकरी अनुयायी शौर्यदिनांनिमित्त सलामी देण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी लाखोच्या संख्येने येतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या जयस्तंभाला भेट दिली होती आणि आपल्या भाषणातून " वी्रांचे वारासदार आहात, कोरेगाव भीमा इथे जाऊन बघा तुमच्या पूर्वजाची नावे जयस्तंभावर कोरलेली आहेत".
जगात ज्या सात महत्वाच्या लढाया माणल्या जातात त्यात कोरेगाव भीमाच्या लढाईचा समावेश असून जगातील तमाम लष्करी फौंजा ह्या लढाईचा अभ्यास करतात.
मात्र या जयस्तंभाच्या जमिनीचा वाद 2018 पासून सूरू आहे, हा नेमका काय आहे? काय अडथळे आहेत? कोण अडथळे निर्माण करतो आहे? यासंदर्भात कोरेगाव भीमा जयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्याशी मॅक्स महाराष्ट्र ने बातचीत केली. नक्की पहा आणि जाणून घ्या खरा इतिहास...