केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार कडून सकल राष्ट्रीय उत्पन्न(GDP) वाढीचे ढोल वाजवले जात असताना पेट्रोल डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र राजाला दोष देते आणि राज्य केंद्राला. महागाईत पिचलेल्या जनतेचे लक्ष विचलित केले जात आहेत का? महागाईला जबाबदार कोण? जीडीपी वाढ भुलभुलैया आहे का? या सगळ्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा केली आहे आर्थिक घडामोडींचे अभ्यासक विश्वास उटगी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. आशा मिर्गे, भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर आणि बहुजन वंचित आघाडीचे फारूक अहमद...