डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची एलर्जी का?
कर्नाटकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची न्यायाधीशांना अॅलर्जी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.;
कर्नाटकमध्ये प्रजासत्ताक दिनी एका न्यायाधीशांनी महात्मा गांधी यांच्या फोटोजवळ ठेवलेला डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा फोटो हटवायला लावला. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता या न्यायाधीशांवर कारवाईची मागणी होते आहे. महापुरूषांच्या फोटोंबाबतचे नियम काय? अशाप्रकारे बाबासाहेबांच्या फोटोला विरोध करण्यामागे मानसिकता काय, याबाबत माजी सनदी अधिकारी महेश झगडे, ई.झेड. खोब्रागडे आणि माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्याशी चर्चा केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....