देशातील महागाई ही देशातील धोरणापेक्षा आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम आहे. यूक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती वाढून देशात इंधनाचे दर वाढले आणि महागाईचा भड़का उडाला आहे. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे देशात गरीब-श्रीमंत यातील दरी वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे देशाने विदेशी देशाच्या आर्थिक भूमिकेचे अंधानुकरण करण्या ऐवजी यावर मात करण्यासाठी भारतीय मॉडल तयार करावे लागेल, असे मत जेष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी MaxMaharashtra वर किरण सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेत व्यक्त केले...