देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठी प्रसिध्द आहेत. अनेकदा ते भाषणांमुळे ट्रोल देखील झाले आहेत. निवडणुक प्रचारात ते स्थानिक भाषा आणि त्या भागातील थोर व्यक्तींचा उल्लेख देखील करतात. आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उल्लेख करत पुण्यातून स्वातंत्र्य लढा आणि समाज सुधारणांमधे योगदान असलेल्या लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट,, आर.जी भांडारकर, महादेव गोविंद रानडे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्री बाई फुले , महर्षी कर्वे, यांच्यासह गोपाळ कृष्ण देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांनी उल्लेख केला नाही हे विशेष. गोपाळ कृष्ण देशमुख नेमके कोण? त्यांचे स्वातंत्र्यलढा आणि समाजसुधारणेत योगदान कोणते ? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत..