सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. याच मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला पराभव स्विकारावा लागला होता. या मतदारसंघात सात मे रोजी मतदान झाले असून प्रचारादरम्यान अनेक मुद्यांवर चर्चा झाली. परंतु प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना विकासाच्या मुद्यावरून प्रचार थेट धार्मिक मुद्यांवर आला. या मतदारसंघात दलित,मुस्लिम,मराठा,लिंगायत मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय स्थितीवर दै.तरुण भारत चे संपादक प्रशांत माने आणि दै. लोकवार्ताचे संपादक किरण बनसोडे यांच्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...