येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. हा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. तशा सुचना राज्य सरकारांनाही देण्यात आल्या आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून 'घरघर तिरंगा !' अशी घोषणा आपल्या प्रधानमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठीचे आदेश व्यवस्थेला दिले आहेत. त्यासाठी अख्ख्या देशाची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. सगळे अधिकारी हातातले काम सोडून याच मोहिमेत सहभागी झालेत. प्रत्येक घरात पोहोचून तिरंगा झेंडा वाटायचा आहे.घर घर तिरंगा म्हणजे काय रे भाऊ.. असे प्रश्न मॅक्स महाराष्ट्राच्या चर्चेत कार्यकारी संपादक विलास आठवलेंनी मान्यवरांसोबत उपस्थित केले आहेत...