उन्हाळ्याच्या सुट्टीचा मुहूर्त साधत मुंबईतील मतदारांनी एसटी, खासगी बस, रेल्वे वाहनाने आपल्या गावाचा रस्ता धरला आहे.त्यामुळे मुंबईतील मतदानाची टक्केवारी राखण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगापुढे आहे.मतदानाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा धसका घेतला आहे. या मतदारांना पुन्हा मुंबईत परत आणण्याचे शिवधनुष्य नेत्यांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना आता पेलायचे आहे. मुंबईचे राजकीय गणित यामुळे कसे बदलणार आहे ? सांगताहेत यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर...