मोदी फक्त बोलतंय..." भारत जोडो यात्रेत सहभागी सर्वसामान्यांना काय वाटतं पहा…
भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून अनेक लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायाला मिळत आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या अनेक लोकांचा राजकारणाशी काहिच संबंध नाहि. तरिदेखील सामान्या नागरिकांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही मते मांडली आहेत. नेमके काय म्हणाले सर्वसामान्य लोक जाणून घेण्यासाठी वाचा अजिंक्य आडके यांच्या रिपोर्ट..;
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असल्याने यात्रेला फार मोठा प्रतिसाद सर्वसामान्य लोकांच्याकडून मिळत आहे. हे इतके सारे लोक या यात्रेत का सहभागी झाल्याने लोकांना राहुल गांधी यांच्याविषयी काय वाटतं? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकं काय म्हणतात..? हे सगळं जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रने प्रयत्न केला आहे. परंतू या यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचा राजकारणांशी काहिच संबंध नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना फसवत आहेत. सांगतात एक आणि करतात काहीतरी भलतंच. अच्छे दिन येणार होते ते आलेच नाहीत. वाढत असलेल्या महागाईमुळे लोकांचा नरेंद्र मोदी सरकारवर सगळ्यात जास्त रोष दिसला.
महागाई, बेरोजगारी, जातीपातीचे सुरू असलेले राजकारण या सगळ्या गोष्टीला कंटाळून सर्वसामान्य लोक राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सामील होत आहेत. या यात्रेत महिला देखील मोठ्या प्रमाणावर पाहायाला मिळत आहेत. काहि तरुण आपल्या बेरोजगारीबद्दल बोलत राहुल गांधी यांच्याशी बोलत असतात. तर कोणी महागाईबद्दल आपली व्यथा मांडत असत.
ग्रामीण भागातील अत्यंत कष्टाने जगणाऱ्या या महिला त्यांच्या भावना अगदी मनापासून राहुल गांधी यांच्या बदद्ल व्यक्त करत असतात. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सामान्य लोकांनी सकारात्मक किंवा नकरात्मक काय मते व्यक्त केली आहेत पाहा हा व्हिडिओ.