बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणावरुन मोठा उद्रेक झाला होता. यामध्ये आमदार जयदत्त क्षिरसागर यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. मोठ्याप्रमाणात जाळपोळ करुन नुकसान करण्यात आली होती. घरावर हल्ला करण्याचा नियोजित कट असून गृहमंत्र्यांना भेटून माहीती दिली असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी दिली
मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान क्षीरसागर यांच्या कार्यालयावर तसेच राहत्या घरावर हल्ला झाला होता. या ठिकाणी दगडफेक तसेच आगही लावण्याचा प्रकार घडला. त्यानंतर कुटुंब प्रमुख म्हणून आज जयदत्त क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणा दरम्यान बीड जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली. निजामाच्या काळातही अशा घटना घडल्या नव्हत्या. आंदोलनातून अशा घटना घडणे दुर्दैव असल्याचं म्हटले आहे. तपासात हा कोणाचा कट होता. हे समोर येईल या संदर्भात गृहमंत्र्यांची देखील मी भेट घेतली आहे. माझ्या घरात कुटुंबीय होते तर कार्यालयात कर्मचारी होते. ते आत असताना आग लावण्यात आली. हा म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकार आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही पाठिंबा दिला. मुंबईतील मोर्चामध्ये मी देखील उपस्थित होतो. असे असताना देखील यामागे कोण हे तपासात समोर येईल असे जयदत्त क्षिरसागर सागर यांनी म्हटले.