देशात सध्या मुस्लिम आक्रमकांनी मंदिरं पाडून बांधलेल्या मशिदींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण या पार्श्वभूमीवर विविध इतिहास अभ्यासक, विचारवंत यांनी इतिहासाबद्दल वेगवेगळी मतं देखील मांडली आहेत. असेच परखड मत व्यक्त केले आहे विद्रोही साहित्यिक पार्थ पोळके यांनी..."पूर्वीच्या काळी येथील वैदिकांनी बौद्ध संस्कृतीवर आक्रमणे केली आणि हजारो बौद्ध धर्मस्थळं नष्ट केली किंवा त्याठिकाणी हिंदू देवळे बनवून ती काबीज केली. हा वैदिकांनी येथील बहुजन लोकांच्या बौद्ध संस्कृती आणि धर्मावर केलेला पहिला हल्ला होता, आजही अनेक हिंदू धर्मस्थळात बौद्ध धर्माच्या खुणा पहाता येतात" असे पार्थ पोळके यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुस्लिम राजांनी हिंदुंच्या मंदिरांवर केलेले हल्ले हे संपत्तीच्या लुटीसाठी होते, असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांची भूमिका समजून घेतली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...