संसदेच्या सदस्य़ांसाठी असंसदीय शब्दांची यादी नव्याने जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तानाशाह (हुकुमशाह), जुमलेजीवी, बालबुद्धी, स्नूपगेट यासारख्या शब्दांचा समावेश आहे. पण या नवीन नियमांच्या आधारे संसदेच्या सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असल्याचा आक्षेप घेतला जातो आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ खासदारांवर नाही तर देशभरातील सर्व विधिमंडळ सदस्यांवर होणार असल्याची टीका आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.