विदुषकाच्या हाती सत्ता दिली तर समाजाला पीडा सहन करावी लागते, संमेलनाध्यक्षांचे सरकारवर आसूड

विदुषकाच्या हाती सत्ता दिली तर समाजाला त्याची पीडा सहन करावी लागते

Update: 2022-04-22 10:28 GMT

थाळ्या वाजवण्याचे भयाण अर्थ विचारवंत सांगत असले तरी त्यांचा आवाज दबका आहे, या शब्दात सद्यस्थितीवर साहित्य संमेलनाध्यक्ष भारस सासणे यांनी परखड भाष्य केले आहे. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घानट शुक्रवारी उदगीर येथे झाले. विदुषकाच्या हाती सत्ता दिली तर समाजाला त्याची पीडा सहन करावी लागते, अशा आशयाचा शेर वाचत सासणे यांनी सध्याच्या जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वातावरणावर आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर शब्दात आसूड ओढला आहे. त्याचबरोबर अमृतकाळ सुरू झाला आहे, असे म्हणत सासणे यांनी आपल्याच एका कथेचा काही भाग वाचून दाखवत सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले.

यावेळी सासणे यांनी कंगना राणावतच्या भीकेतील स्वातंत्र्य या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत हा निर्बुद्धपणा असल्याची टीका केली. एवढेच नाही तर सध्याच्या अस्थिर वातावरणात, विद्वेषाच्या वातावरणात साहित्यिकांनी बोलावे लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.


Full View 


Tags:    

Similar News