आम्ही भटकतो आमच्या पोराले बी भटकाया लावायचं का? आदिवासी महिलेचा सरकारला सवाल
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक आपल्या मागण्या घेऊन विधिमंडळावर मोर्चा काढत असतात. त्यातच बिगर सातबारा शेतकरी संघटनेने आदिवासी समाजाला गायरान पट्टे मिळावेत, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. यावेळी आदिवासी महिलेने आपली करुण कहाणी सांगितली. आमच्या पिढ्या भटकत राहिल्या, आता आमच्या पोरांनी बी भटकत राहायचं का? असा सवाल यावेळी आदिवासी महिलेने केला आहे. नेमक्या मागण्या आणि आदिवासींची करुण कहाणी जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा यशवंत स्टेडयम रिपोर्ट नक्की पहा...