माध्यमांनी दाभोलकरांच्या कार्याऐवजी मर्डर केसचंच कव्हरेज सुरू ठेवलंय – अलका धुपकर
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे आरोपी अजुनही मोकाट आहेत. असं असलं तरी वारंवार अंधश्रध्दा निर्मुलन समिती त्यांच्या विचारांचा राज्याच्या विविध गावात आणि शहरात प्रसार करत असतात. त्यांचे विचार हे कलेच्या माध्यमातूनही जनसामान्यांपर्यंत पोहचवता येऊ शकतात असा विचार करून हे कला प्रदर्शन आयोजित केल्याचं आयोजक तसेच पत्रकार अलका धुपकर सांगतात.
आजच्या घडीला तरूणाईला दाभोलकर हे नाव फक्त त्यांच्या हत्येच्या बातम्यांमुळे ठाऊक आहे. कारण माध्यमांनी त्यांच्या कार्याच्य़ा बातम्या करायच्या सोडून फक्त हत्येच्य़ा बातम्या कव्हर करणं सुरू ठेवलं आहे. शिवाय पालकही दाभोलकर मुलांपर्यंत पोहावेच याची तसदी घेत नाहीत. तर दाभोलकरांची पुस्तकही ही तरूणाई किंवा पुढची पिढी वाचण्याला प्राधान्य देणार नाही त्यासाठी मग कसे दाभोलकर त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील तर ती म्हणजे कला. आणि म्हणुन हे कला प्रदर्शन भरवल्याचं आयोजक अलका धुपकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.