राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर सरकारने शाळा, महाविद्यालयं सुरू करण्याचे आदेश दिले. पण कोरोनाच्या दीड वर्षांच्या विद्यार्थ्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या काळात शाळा ऑनलाईन असतानाही वसूल करण्यात आलेली फी, कॉलेज सुरू झाल्यानंतरही फीमध्ये सवलत मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. वसतीगृह सुरू नाहीयेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती हे सगळे प्रश्न आजही विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. पण यावर राज्य सरकार पाहिजे तेवढे गंभीर नसल्याचे चित्र आहे. सरकारचे काय चुकते आहे याचे परखड विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....