कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज असून प्रशासणाची तयारी बघण्यासाठी आजची रंगीत तालीम आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.सिरम आणि भारत बायोटेकची लस देण्यासाठी तयार असून त्यासाठी ड्रॅग अँथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे.
ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. लसीकरण झाल्यानंतर पेशंटला काही त्रास होतो का काही अडथळे येतात का त्यासाठी आज रंगीत तालीम झाल्याचं देखील टोपे म्हणाले. 8 कंपन्या पैकी 2 कंपन्यांच्या वॅक्सिन तयार असून ड्रग अँथोरिटीची परवानगी मिळणं गरजेची आहे असंही टोपे म्हणाले.