एसटीच्या विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आपला लढा अधिक तीव्र केलाय. बीड आगारात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 122 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नाही, त्यामुळे कामगारांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन केल आहे. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, असं म्हणत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले.