दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात शिक्षणाचा उजेड आणण्याचे कार्य केले ते लुई ब्रेल यांनी....त्यांनी निर्माण केलेल्या या ब्रेल लिपीमुळे दृष्टीहीन लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली. लुई ब्रेल यांचा ४ जानेवारी हा जन्मदिन....यानिमित्त पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अंध व्यक्तींना उपयुक्त ठरतील अशी विविध साधनं, उपकरणं तरुणांनी तयार केली आहेत, यामध्ये काही उपकरणं ही तर अंध तरुणांनी तयार केली आहेत, याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...