अयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे यासाठी देशातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी केले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचे स्पष्ट होते. जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत, असे आनंद शिंदे यांनी म्हटले आहे. आनंद शिंदे यांनी नेमके काय म्हटले आहे ते पाहूया....