जेवायला बोलावलं होतं, बंडाची कल्पना नव्हती, आमदाराचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार स्थापन झाले आणि आता बंडखोर आमदारांनी एकेक गौप्यस्फोट करण्यास सुरूवात केली आहे. असाच गौप्यस्फोट केला आहे, बंडखोर आमदार विश्वनाथ भोईर यांनी...त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...;
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार स्थापन झाले आणि आता बंडखोर आमदारांनी एकेक गौप्यस्फोट करण्यास सुरूवात केली आहे. असाच गौप्यस्फोट केला आहे, बंडखोर आमदार विश्वनाथ भोईर यांनी….
आम्हाला घोडबंदर रोडला जेवायला जायचं आहे असं सांगितले होतं, तेव्हा बंडाची कल्पना नव्हती, असे भोईर यांनी सांगितले. एवढेच नाही तर शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मौन पाळून आहेत, असे त्यांनी सांगितले. पण आपल्याला मातोश्री एकनाथ शिंदेंमुळे दिसली, त्यामुळे आपले नेते एकनाथ शिंदे आहेत, ते जो निर्णय घेतील तो मान्य, असेल असे त्यांनी सांगितले.
भाजप शिवसेना फोडण्यात यशस्वी झाली आहे, असेही त्यांनी मान्य केले आहे. पण उद्धव ठाकरेंचा फोन आला तरी आपण आता मातोश्रीवर जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण शिवसेना आज ना उद्या एकत्र येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. शिंदे भाजपच्या सोबत मिळून काही कारस्थान करत असल्याचे उद्धव ठाकरे यांना समजले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना बाहेर ठेवले गेले होते आणि तेव्हाच आम्ही एकनाथ शिंदे यांना रडताना पाहिले, अशीही माहिती भोईर यांनी दिली आहे.