आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने मॅक्समहाष्ट्र पर्व समतेचा हा विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमात मॅक्समहाराष्ट्रचे सीनियर करस्पॉन्डन्ट् किरण सोनावणे यांनी Adv. वैशाली डोळस यांच्याशी विशेष बातचीत केली.
या कार्यक्रमात ज्या काळात महिलांना पडद्यात आणि पुरुषांना गुलामीत राहावे लागत होते. त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी विविध कायदे आणि योजना आखून स्त्री मुक्ती आणि स्त्री स्वातंत्र्याचा पाया आपल्या कोल्हापूर संस्थानात रचला. महाराजांनी कोणते कायदे केले आणि कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या? हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा Adv. वैशालीताई डोळस यांचे हे व्याख्यान