तुम्ही लोकशाहीचे आधार स्तंभ आहात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांमधील 'तो' संवाद
लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील नात्यांबाबत अनेक आठवणी अनेक लोकांनी लिहून ठेवल्या आहेत. खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे संबंध कसे कसं होतं. लोकशाहीचे पुरस्कर्ते असणाऱ्या बाबासाहेबांना एका राजाची राजेशाही पद्धती इतकी का भावली? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहून राजर्षी शाहू महाराजांना तुम्ही लोकशाहीचे आधार स्तंभ आहात. असं का म्हटलं? शाहू महाराजांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी कोणते कार्य केले?
यासंदर्भात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने मॅक्समहाष्ट्र पर्व समतेचा हा विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमात मॅक्समहाराष्ट्रचे सीनियर करˈस्पॉन्डन्ट् किरण सोनावणे यांनी Adv. जयश्री शेळके यांच्याशी विशेष बातचीत केली.